कुर्डूगड मानगड स्वारी

कुर्डूगड आणि मानगड करायचा ठरवले तेव्हा आमच्या ग्रुप मधले सर्व तयार झाले होते, अचानक २ आठवडे मी स्वतः व्यस्त असल्याने हा प्लॅन मी विसरलो होतो, २५ला मी आणि अनिल माझ्या आवडीच्या वि-रेंजर्स ग्रुप सोबत गडगडा ट्रेक करून आलो, तेव्हा सुद्धा काही मनात नव्हते की पुढच्या आठवड्यात हा ट्रेक करायचा आहे...नाही हो म्हणत कुठला दुसराच प्लॅन कागदावर आला पण अचानक ५ जण जमल्याने पुन्हा तेच २ किल्ले करायचे ठरवले. काही जण म्हणत होते रात्री निघूया पण आमचा नेहमीचा रथसारथी असीम दुसऱ्या मोहिमेवर असल्याने त्याला रात्री निघणं शक्य नव्हते त्यामुळे सकाळीच ठाणेवरून निघायचे ठरवले....आमच्या नेहमीच्या ग्रुप मधले ५ जण कुणाल, हेमेश,अनिल, प्रथमेश आणि मी होतो, उरलेले ३ जण अनिलच्या ओळखीचे होते,६ वाजता ठाणेेवरून निघालो होतो पण बाकीच्यांना पिकअप करत करत जुईनगरलाच 7 वाजले नंतर असिमने जी गाडी पळवली त्याला तोड नाही... पालीला नाश्ता करून आम्ही थेट १० वाजता पायथ्याचे गाव उंबर्डी गाठले, जिते गावातून सुद्धा एक वाट कुर्डूवाडीत जाते पण ती जास्त चढणीची आणि वेळखाऊ होती म्हणून आम्ही उंबर्डी गावातून गड चढायला घेतला, शाळेच्या...