सिन्नरची मुशाफिरी

सिन्नर रेंज कधीपासून करायची होती... कशी आणि कोणाबरोबर करायची तेच कळत नव्हते, माहिती अगोदरच काढली होती.. शेवटी संपुर्ण माहिती काढून प्लॅन बनवला, बाकीची माहिती मी अमित बोरोलेचे पुस्तक 'दुर्गभ्रमंती नाशिकची' यातून घेतली. तारीख २५-२७ मार्च ठरवली त्यात ६ किल्ले आणि ४ मंदिरे करायचे ठरवले.. नेहमीप्रमाणे विनयची काहीतरी अडचण आली आणि त्याने सुरवातीलाच माघार घेतली.. मग नेहमीच्या ट्रेकिंगवाल्या व्हॉट्सप ग्रुपवर विचारुन बघितले आणि कुणाल कदम ,हेमेश तांडेल ,प्रसाद नायकने लगेच होकार दिला, एखादी लहानशी गाड़ी करुन ट्रेक करायचे ठरवले, लगेचच मी आमचा नेहमीचा रथसारथी असीमला फोन करुन त्याची गाडी बुक केली. निघायचा दिवस आला,सगळे गुरुवारी ऑफिस मधून लवकर घरी आणि घरी जाऊन रात्री 12 वाजता ठाणे स्टेशनला भेटले, असीम त्याची इंडिका घेऊन आलाच होता.मुंबई-नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे 10 मिनिटासाठी चहासाठी कसाऱ्याला थांबलो आणि तडक नाशिक शहर पार करून सिन्नर बसस्थानकडे पुन्हा थांबा घेतला, तेवढंच सिन्नर बसस्थानक आम्ही फिरून घेतले. मला नेहमीप्रमाणे गाडीत काही झोप येत नव्हती, जिपिएस चालू केला,सोन गड आणि पर्वतगडच...