Posts

Showing posts from August, 2018

मोरगिरी किल्ला

Image
कित्येक दिवस मोरगिरी करायचा ठरवत होतो पण त्याची माहिती शक्यतो कुठेच मिळत नव्हती, पवन मावळातील हा किल्ला तसा अपरिचितच आहे..... नुकताच आमचा ट्रेकमित्र प्रसाद कुलकर्णी किल्ल्यावर जाऊन आला होता आणि त्याने योग्य अशी माहिती व्हाट्सएपच्या ग्रुपवर टाकली होती...शुक्रवारपर्यंत तसे काही जाण्याचा प्लॅन नव्हता पण अचानक हाच किल्ला करायचे ठरवले, नेहमीप्रमाणे शेवटी कुणाल आणि विनयच ट्रेकला आले..४-५ जणांनी स्वतः फोन करून सुद्धा आले नाही हे विशेष, पण हे काही नवीन नव्हते... सकाळी कर्जतपर्यंत लोकलने आणि कर्जतवरून इंद्रायणी एक्सप्रेस पकडून लोणावळाला उतरायचे ठरवले..तेवढेच कर्जतपर्यंत बसून जायला मिळते 😉 लोणावळा स्टेशन वरून एसटी पकडण्यासाठी डेपोत ८.१५ वाजता शिरलो, 9.00 ची भांबुर्डे एसटी पकडायची असल्याने बराच वेळ होता, म्हणून पेटपूजा करण्यासाठी हॉटेल मध्ये गेलो तिकडे आम्हाला पवन आणि त्याचा मित्र भेटला, ते सुद्धा प्रिती पटेल बरोबर घाटवाटा करण्यासाठी आले होते, एसटी मध्ये आम्हाला जुने मित्र प्रिती, आदित्य आणि यज्ञेष भेटले, मग ट्रेकच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या... मोरगिरी किल्ला एसटीने आम्हाला घुसळख...

कामणदुर्ग किल्ला

Image
ठाणे जिल्ह्यातील उंचीत दुसर्‍या क्रमांकावर असलेला किल्ला - कामणदुर्ग  ट्रेक दिनांक : २९ -०७ - २०१८  शक्यतो आम्ही पावसात किल्ले करत नाही कारण धुक्यामुळे आणि वाढलेल्या झाडी-गवतामुळे किल्ल्यावरचे अवशेष शोधायला कठिण होऊन जाते तसेच धुक्यामुळे किल्ल्याचे भौगोलिक स्थानच नीट कळत नाही पण काही किल्ले मी आता सर्व मोसमात करायचे ठरवले आहे, त्यात मृगगड उन्हाळ्यात आणि मागच्या आठवड्यात भर पावसात केला त्यात पावसात सह्याद्री खूपच सुंदर हिरवाईने सजलेला असतो म्हणून यावेळी आमचा कित्येक दिवस राहिलेला कामणदुर्ग करायचे ठरवले...... नेहमीच्या ग्रुप मध्ये विचारून बघितले पण नेहमीप्रमाणे मी आणि कुणालच तयार झालो, बाकीच्यांचा हा ट्रेक करून झाला होता, तर काही जण दुसऱ्या ट्रेकला जात होते ..... कुणालने त्याच्या मित्र नंदूला विचारले आणि तो सुद्धा तयार झाला, नंदूबरोबर गेल्यावर्षी पालघरचा काळदुर्ग केला होता त्यांनतर तो काही बाकीच्या ट्रेकला आला नव्हता, कामणदुर्ग वर असलेल्या रॉक पॅच मुळे त्याचे शेवटपर्यंत हो-नाही चालले होते, परंतु तो शेवटी ट्रेकला आला, तो आला नसता तरी आम्ही दोघांनीच हा ट्रेक करायचे...

ठाणाळे लेणी

Image
ठाणाळे लेणी करायची खूप दिवस ठरत होते पण ऐनवेळी आम्ही नेहमी वेगळा प्लॅन करून दुसरीकडेच जायचो, आता पावसाळा आला होता, काही किल्ल्यांवर तर जायला देखील नको अशी परिस्थिती सध्या झाली आहे म्हणून आड वाटेचे ट्रेक्स करायला हवेत... यावेळी सुरवातीला फक्त मी आणि कुणालच जाणार होतो, पण नंतर हेमेश आणि स्वप्ना देखील तयार झाले... सकाळची CST वरून ५.२० ला सुटणारी कर्जत पकडून नंतर कर्जत-खोपोली पकडून जायचे ठरवले, कुणालने करीरोड वरून, मी, हेमेश, स्वप्ना ने डोंबिवली वरून ट्रेन पकडली, ट्रेन कर्जतला ७.५० ला उशिरा पोहचली, दुसऱ्या प्लेटफॉर्मला ८.०० वाजताची कर्जत-खोपोली ट्रेन लागली होती, आम्ही ८.३० वाजता खोपोलीला पोहचलो. स्टेशन बाहेरच हॉटेल मध्ये पेटपूजा करून आम्ही आमचा मोर्चा एसटी स्टँडकडे वळवला, स्टेशन  बाहेर  5 मिनिटे चालत गेलात की एक एसटीचा थांबा लागतो, तिकडे आम्ही बराच वेळ पाली एसटीची वाट पाहिली, पण एसटी काही आली नाही... शेवटी स्टेशनपासून ३ किमीवर असलेल्या मुख्य एसटी डेपोत आम्ही शेअर रिक्षा करून निघालो, एसटी डेपोत पोहचल्यावर कळाले की ९.४५ पाली साठी एसटी आहे म्हणजे अजून अर्धा तास थांबण्याशिवा...