मोरगिरी किल्ला

कित्येक दिवस मोरगिरी करायचा ठरवत होतो पण त्याची माहिती शक्यतो कुठेच मिळत नव्हती, पवन मावळातील हा किल्ला तसा अपरिचितच आहे..... नुकताच आमचा ट्रेकमित्र प्रसाद कुलकर्णी किल्ल्यावर जाऊन आला होता आणि त्याने योग्य अशी माहिती व्हाट्सएपच्या ग्रुपवर टाकली होती...शुक्रवारपर्यंत तसे काही जाण्याचा प्लॅन नव्हता पण अचानक हाच किल्ला करायचे ठरवले, नेहमीप्रमाणे शेवटी कुणाल आणि विनयच ट्रेकला आले..४-५ जणांनी स्वतः फोन करून सुद्धा आले नाही हे विशेष, पण हे काही नवीन नव्हते... सकाळी कर्जतपर्यंत लोकलने आणि कर्जतवरून इंद्रायणी एक्सप्रेस पकडून लोणावळाला उतरायचे ठरवले..तेवढेच कर्जतपर्यंत बसून जायला मिळते 😉 लोणावळा स्टेशन वरून एसटी पकडण्यासाठी डेपोत ८.१५ वाजता शिरलो, 9.00 ची भांबुर्डे एसटी पकडायची असल्याने बराच वेळ होता, म्हणून पेटपूजा करण्यासाठी हॉटेल मध्ये गेलो तिकडे आम्हाला पवन आणि त्याचा मित्र भेटला, ते सुद्धा प्रिती पटेल बरोबर घाटवाटा करण्यासाठी आले होते, एसटी मध्ये आम्हाला जुने मित्र प्रिती, आदित्य आणि यज्ञेष भेटले, मग ट्रेकच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या... मोरगिरी किल्ला एसटीने आम्हाला घुसळख...