Posts

कुर्डूगड मानगड स्वारी

Image
कुर्डूगड आणि मानगड करायचा ठरवले तेव्हा आमच्या ग्रुप मधले सर्व तयार झाले होते, अचानक २ आठवडे मी स्वतः व्यस्त असल्याने हा प्लॅन मी विसरलो होतो, २५ला मी आणि अनिल माझ्या आवडीच्या वि-रेंजर्स ग्रुप सोबत गडगडा ट्रेक करून आलो, तेव्हा सुद्धा काही मनात नव्हते की पुढच्या आठवड्यात हा ट्रेक करायचा आहे...नाही हो म्हणत कुठला दुसराच प्लॅन कागदावर आला पण अचानक ५ जण जमल्याने पुन्हा तेच २ किल्ले करायचे ठरवले.  काही जण म्हणत होते रात्री निघूया पण आमचा नेहमीचा रथसारथी असीम दुसऱ्या मोहिमेवर असल्याने त्याला रात्री निघणं शक्य नव्हते त्यामुळे सकाळीच ठाणेवरून निघायचे ठरवले....आमच्या नेहमीच्या ग्रुप मधले ५ जण कुणाल, हेमेश,अनिल, प्रथमेश आणि मी होतो, उरलेले ३ जण अनिलच्या ओळखीचे होते,६ वाजता ठाणेेवरून निघालो होतो पण बाकीच्यांना पिकअप करत करत जुईनगरलाच 7 वाजले नंतर असिमने जी गाडी पळवली त्याला तोड नाही... पालीला नाश्ता करून आम्ही थेट १० वाजता पायथ्याचे गाव उंबर्डी गाठले, जिते गावातून सुद्धा एक वाट कुर्डूवाडीत जाते पण ती जास्त चढणीची आणि वेळखाऊ होती म्हणून आम्ही उंबर्डी गावातून गड चढायला घेतला, शाळेच्या...

सिन्नरची मुशाफिरी

Image
सिन्नर रेंज कधीपासून करायची होती... कशी आणि कोणाबरोबर करायची तेच कळत नव्हते, माहिती अगोदरच काढली होती.. शेवटी संपुर्ण माहिती काढून प्लॅन बनवला, बाकीची माहिती मी अमित बोरोलेचे पुस्तक 'दुर्गभ्रमंती नाशिकची' यातून घेतली. तारीख २५-२७ मार्च ठरवली त्यात ६ किल्ले आणि ४ मंदिरे करायचे ठरवले.. नेहमीप्रमाणे विनयची काहीतरी अडचण आली आणि त्याने सुरवातीलाच माघार घेतली.. मग नेहमीच्या ट्रेकिंगवाल्या व्हॉट्सप ग्रुपवर विचारुन बघितले आणि कुणाल कदम ,हेमेश तांडेल ,प्रसाद नायकने लगेच होकार दिला, एखादी लहानशी गाड़ी करुन ट्रेक करायचे ठरवले, लगेचच मी आमचा नेहमीचा रथसारथी असीमला फोन करुन त्याची गाडी बुक केली. निघायचा दिवस आला,सगळे गुरुवारी ऑफिस मधून लवकर घरी आणि घरी जाऊन रात्री 12 वाजता ठाणे स्टेशनला भेटले, असीम त्याची इंडिका घेऊन आलाच होता.मुंबई-नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे 10 मिनिटासाठी चहासाठी कसाऱ्याला थांबलो आणि तडक नाशिक शहर पार करून सिन्नर बसस्थानकडे पुन्हा थांबा घेतला, तेवढंच सिन्नर बसस्थानक आम्ही फिरून घेतले. मला नेहमीप्रमाणे गाडीत काही झोप येत नव्हती, जिपिएस चालू केला,सोन गड आणि  पर्वतगडच...